Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यसावधान! आता आलं 'लासा' फिवरचं नवं संकट! जाणून घ्या काय आहेत लक्षणे

सावधान! आता आलं ‘लासा’ फिवरचं नवं संकट! जाणून घ्या काय आहेत लक्षणे

कोरोनाचे संकट जगातून अजून गेलेले नाही. संपूर्ण जग कोविड 19 च्या व्हायरसमुळे हैराण असताना हे कमी होते की काय? म्हणून आता नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. ‘लासा’ असे या नवीन विषाणूचे नाव असून ब्रिटनमध्ये या विषाणूने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या विषाणूची लागण झालेले तीन रुग्ण आढळून आले आहे. यातील एकाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. हा विषाणू आफ्रिकन देशाव्यतिरिक्त कुठेही पोहोचला नसला तरी ब्रिटनमधील केसनंतर चिंता वाढली आहे.

या प्रकारात मृत्यूचे प्रमाण जास्त नसले तरी 80 टक्के प्रकरणांमध्ये कोणतेही लक्षण दिसून येत नाही. युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते या, आजारावर आतापर्यंत कोणताही इलाज मिळालेला नाही. काही रुग्णांनाची प्रकृती गुंतागुंतीची होत त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. यातील 15 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. गर्भवती स्त्रियांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे.

हा आजार सर्वात प्रथम 1969 साली पश्चिम आफ्रिकेच्या नायजेरियातील ‘लासा’ येथे आढळला. तेव्हा दोन नर्सचा मृत्यू झाल्यानंतर याची दाखल घेण्यात आली होती. हा आजार उंदरांमुळे पसरतो. तो पहिल्यांदा नायजेरिया, गिनिया, सियरा, लियोन, लायबेरिया येथे महामारी म्हणून घोषित झाला होता. उंदराची लघवी, विष्ठामुळे किंवा त्यांनी दूषित केलेल्या खाद्य पदार्थामुळे लासाची लागण होण्याची शक्यता वाढते. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यांना देखील संसर्ग होत.

लासा विषाणूची लागण झाल्यानंतर 1 ते 3 आठवड्यांनी रुग्णाला सौम्य लक्षणे दिसतात. यता सुरुवातीला ताप येतो, त्यानंतर थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी ही लक्षणे दिसतात. यासह रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणे, चेहऱ्यावर सूज येणे, कंबर, छाती आणि पोटात दुखायला लागते. लक्षणं तीव्र झाल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. यासह काहींचे अवयव निकामी होऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -