Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रआपल्याच पोटच्या मुलीचा बापाने केला विनयभंग

आपल्याच पोटच्या मुलीचा बापाने केला विनयभंग

जन्मदात्याने आपल्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करून झाल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तिच्यासह आजीला जिवे मारण्याची धमकी दिली. बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नाशिक मधील सिन्नर परिसरात सोमवारी (दि.14) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी ही तिच्या आजीसोबत घरात असताना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नराधम पित्याने पीडित मुलगी व तिच्या आजीला शिवीगाळ व दमदाटी करुन पीडित मुलीला तू मला खूप आवडते असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलगी व आजीला जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित मुलीने सिन्नर पोलिस ठाण्यात जाऊन घटना कथन केली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी नराधम पित्याविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक रामदास धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -