रोहित सेनेने एकदिवसीय मालिकेत 3-0 असे निर्विवाद यश मिळविानंतर भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिका बुधवार (दि.16) पासून सुरू होणार असून, ऑक्टोबर महिन्यात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी योग्य संयोजन करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारताला गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी जेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले जात होते; पण साखळी फेरीतच संघ गारद झाला. या स्पर्धेदरम्यान संघाच्या कमकुवत बाजू समोर आल्या. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा कार्यक्रम व्यस्त आहे आणि त्यामुळे मजबूत संघ तयार करण्यावर अधिक भर असणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल संघांचे जेतेपद मिळवले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली आता भारताला सलामी जोडी, मध्यक्रमातील फलंदाजी आणि गोलंदाज याबाबत रणनीती तयार करावी लागेल. भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने विकेटकिपर फलंदाज ईशान किशनला 15 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले.