कोरोना आणि महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. सरकार राज्यातील 16 शहरांचे वीज वितरण खासगी कंपन्यांकडे सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयानंतर वीज ग्राहकांना विजेच्या वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागू शकते.
ऊर्जा मंत्रालयाकडून राज्यातील 16 शहरांमधील वीज वितरण यंत्रणा खासगी कंपन्यांकडे सुपूर्द होऊ शकते. त्याबाबत हालचाली होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे सर्व सामान्यांना वीज दरवाढीचा सामना करावा लागू शकतो.
कोरोना महामारीमुळे आधीच राज्यातील जनता हैराण झाली आहे. त्यात महागाईने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम होत अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहे. यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. अशातच वीज वितरण खासगी कंपन्यांकडे गेले तर वाढीव बिलाचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या अजूनही बहुतांश ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यात महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे बजेट बिघडले आहे. अनेक जण बेरोजगार झाले आहे. अशात आता पुन्हा वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांना सहन कराव लागेल. त्यातच आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात विजेचा वापर वाढतो. त्यामुळे वाढीव वीजबिल सर्वसामान्यांचा घाम फोडणारा ठरणार हे नक्की.
या शहरांना बसू शकतो वीज दरवाढीचा झटका…
– लातूर
– सोलापूर
– कोल्हापूर
– औरंगाबाद
– अकोला
– नागपूर
– ठाणे
– कल्याण
– भांडुप
– नाशिक
– पुणे