Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलांचा हिडीसपणा ; कोयत्याने केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलांचा हिडीसपणा ; कोयत्याने केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुण्यातील अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपली दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. या माध्यमातून कधी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्याचे व्हिडिओ सोशल माध्यमावर पोस्ट केले जात. मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी इंस्टाग्रामवर अश्लील भाषेत व्हिडीओ तयार करून धुमाकूळ घालणाऱ्या थेरगाव क्वीनवर कारवाई केली होती. त्यानंतर आता पुण्यातील लोहियानगर परिसरात दहशत निर्मण करण्यासाठी कोयत्याने केक कापून त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्यामुलांवर कारवाई केली आहे.

पुण्यातील लोहियानगर परिसरातील पी.एम.सी कॉलनी नं 9 येथे अल्पवयीन मुलांनी वाढ दिवस साजरा केला. हा वाढदिवस साजरा करत असताना परिसरात मोठ्याने डीजे लावण्यात आला होता. संबंधित बड्डे बॉयने हातात कोयता घेऊन दशहत निर्माण करत त्या कोयत्याने केक कापला. याच दरम्यान कर्कश आवाजात डीजे लावत त्याचे दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याचा व व्हिडीओ सोशाल मीडियावर व्हायरल केला. या घटनेची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर तातडीने त्यांची दाखल घेत संबाधित मुलांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरवात केली. तपासा दरम्यान पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी स्टाफसह लोहियानगर भागातछपेमारी केली. त्यावेळी त्यांनी छापा घालुन सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्यकडून 1 कोयता जप्त केला आहे. त्याच्या विरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -