आधार कार्ड जर हरवले तर आता काळजी करण्याची कोणतेही गरज नाही, कारण आता त्याची दुसरी प्रत मिळेल. आणि तीही सरकारी कार्यालयात न जाता. आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. ही प्रक्रिया आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने ऑनलाइन प्रक्रियेच्या मदतीने करू शकता.
कसा करायचा आधार कार्डसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज
सर्व प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid या लिंकला भेट द्या
त्यानंतर आधार क्रमांक निवडा
पूर्ण नाव टाईप करा
आधारकार्डला लिंक असलेला फोन नंबर त्यामध्ये टाका
तुम्ही मोबाइल नंबर ऐवजी ईमेल आयडी देखील वापरू शकता
यानंतर लिंक असलेल्या मोबाईल नंबरला ओटीपी येईल
आणि मेल आयडीवर OTP येईल
OTP प्रविष्ट केल्यानंतर सबमिट करा.
त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबरवर SMS द्वारे येईल
असा करा ‘ई-आधार’चा अर्ज
अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर 12-अंकी आधार कार्ड क्रमांक टाका.
कॅप्चा कोड भरल्यांनतर OTP पाठवा.
Verify & Download वर क्लिक करा
यानंतर नवीन तयार केलेले ई-आधार डाउनलोड होईल.