Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाShreyas Iyer बनला कोलकाता नाईट रायडर्सचा 6वा कर्णधार, KKR संघाची घोषणा

Shreyas Iyer बनला कोलकाता नाईट रायडर्सचा 6वा कर्णधार, KKR संघाची घोषणा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरला सामील करून कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मोठी घोषणा केली आहे. केकेआरने श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer ) संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. यासह श्रेयस अय्यर या संघाचा सहावा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्क्युलम, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक आणि इऑन मॉर्गन यांनी केकेआरचे नेतृत्व केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. 2012 मध्ये कोलकाताने अंतिम सामन्यात चेन्नईचा तर 2014 मध्ये पंजाबला पराभूत केले होते. या दोन्ही फायनलमध्ये गौतम गंभीर कर्णधार होता.

कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. अय्यर यांनी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळली आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ दोन वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली, दिल्ली कॅपिटल्सने 2019 मध्ये अंतिम चारमध्ये प्रवेश केला आणि 2020 मध्ये संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. अशा स्थितीत अय्यरच्या कर्णधारपदावर कोलकाता संघाचा पूर्ण विश्वास असेल.

सौरव गांगुली केकेआरचा पहिला कर्णधार
कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला कर्णधार सौरव गांगुली होता. दुस-या सत्रात ब्रेंडन मॅक्क्युलमकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती, पण पुढच्याच सत्रात दादाकडे पुन्हा संघाची कमान आली. चौथ्या सत्रापासून 10व्या हंगामापर्यंत गौतम गंभीरने संघाची धुरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 2 विजेतेपदेही पटकावली. त्यानंतरच्या आयपीएल-11 मध्ये दिनेश कार्तिककडे कोलकाता नाइट रायडर्सची जबाबदारी देण्यात आली होती. सीझन-13 आणि 14 मध्ये इऑन मॉर्गनकडे जबाबदारी देण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -