Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगट्रॅक्टर-पिकअपच्या भीषण अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

ट्रॅक्टर-पिकअपच्या भीषण अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर मुलीसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन शनीचे रोडवर बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या दिलेल्‍या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की, यामध्ये राक्षसभूवन येथील चंद्रशेखर शामराज पाठक ( वय वर्ष ३९ ) व त्यांचा मुलगा आर्यन ( वय १२ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मंजरी चंद्रशेखर पाठक (वय ११) हिच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले.

अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनाच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा करून शवविच्छेदन साठी गेवराई उपजिल्हा रूग्णालय दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -