Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगSBI नंतर आता HDFCमध्येही फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी खूशखबर

SBI नंतर आता HDFCमध्येही फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी खूशखबर

फिक्स डिपॉझिट करण्याच्या इराद्यात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता एचडीएफसी बँकेत एफडी करणाऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकणार आहे. बँकेनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन याबाबतची माहिती जारी केली आहे. दोन कोटी पेक्षा कमी रक्कमेच्या एफडीवर 5 ते 10 पॉईन्ट्सने इंटरेस्ट रेट वाढवला आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, याआधीच एसबीआय बँकेनंही अशाप्रकारने ग्राहकांना दिलासा दिला होता. एसबीआयनंही दो वर्षांपेक्षा जास्त वेळ एफडी करणाऱ्यांच्या बेसिक पॉईन्ट्समध्ये वाढ केली होती. 10-15 बेसिस पॉईन्ट्सची वाढ एसीबीआयकडून करण्यात आली होती. आरबीआयकडून रेपो रेट आणि इतर बाबी स्थिर ठेवण्यात आल्यामुळे एचडीएफसीनं आपल्या एफडीच्या इंटरेस्टमध्ये (Fixed Deposit Interest Rate) वाढ गेली आहे. फक्त एचडीएफसीच नव्हे तर इतरही अनेक बँकांनी आपल्या फिक्स डिपॉझिटमधील व्याजदरातही वाढ केली आहे.

नवे एफडी दर काय आहेत?
HDFC बँकेनं एक वर्षांच्या एफडी व्याजदर दरात 10 बेसीस पॉईन्ट वाढवणून आता 4.9 वरुन पाच टक्के इतका इंटरेस्ट देण्याचं जाहीर केलंय. तर तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्यांना आता 5.45 टक्के इतका इंटरेस्ट रेट मिळणार आहे. हे नवे दर 14 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत.

या आधी बँकेनं जानेवारीत दोन वर्षांपेक्षा जास्त ते तीन वर्षांपर्यंत एफडी करणाऱ्यांना 5.3 टक्के तर 3 वर्षांपेक्षा जास्त ते 5 वर्षांपेक्षा जास्त एफडी करणाऱ्यांना 5.4 टक्के तर पाच वर्षांपेक्षा जास्त ते 10 वर्षांपर्यंत एफडी करणाऱ्यांना 5.6 टक्के व्याजदर देण्याचं जाहीर केलं होतं.

एफडी करणाऱ्यांना खूशखबर
आरबीआयनं 10 फेब्रुवारीला आपले रेपो आणि रिव्हर्स रेपो दर न बदलण्याचं जाहीर केलं. या घोषणेनंतर अनेक बँकांनी ग्रहाकंना दिलासा देण्यासाठी आपल्या एफडी व्याजदरात बदलाव केले होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यूको बँकनं 10 फेब्रुवारी 2022पासून 2 कोटीपेक्षा कमी रक्कम असलेल्यांना दिलासा देत व्याजदरात वाढ केली होती.

एसबीआयमध्ये किती व्याज मिळणार?
2 कोटीपर्यंत रिटेल टर्म डिपॉझिट 2 वर्ष+ ते 3 वर्ष केल्यास 5.30 टक्के व्याजदर मिळेल. हा व्याजदर याआधी 5.10 टक्के इतकाच होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. तर 3+ वर्ष ते 5 वर्ष डिपॉझिट केल्यास 5.45 टक्के व्याजदर मिळेल. तर दुसरीकडे 5+ वर्ष ते 10 वर्ष डिपॉझिट केल्यास 5.50 टक्के व्याजदर मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -