Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशिवसेना उपनेत्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, गरोदर तरुणीचा जबरदस्तीने केला गर्भपात!

शिवसेना उपनेत्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, गरोदर तरुणीचा जबरदस्तीने केला गर्भपात!

राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप 24 वर्षीय पीडित तरुणीने केला आहे. इतकेच नाही तर रघुनाथ कुचिक यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. गरोदर झाल्यावर जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप देखील पीडित तरुणीने केला आहे. यामुळे शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.मात्र, एका ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत तरुणीने पोलिसांसमोर आपबिती सांगितली.

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे, की शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांनी आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून आपण गरोदर राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. गर्भपात करण्यास जबरदस्ती केली, असा गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर तरुणीने केला आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या संदर्भात अद्याप शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -