Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय घडामोडीठाकरे कुटुंबाला बदनाम करून उद्धव ठाकरे यांना खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे...

ठाकरे कुटुंबाला बदनाम करून उद्धव ठाकरे यांना खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे आहे का?; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बदनाम करून उद्धव ठाकरे यांना खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे आहे का? विरोधकांना उसकवून संजय राऊत यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असा सवाल करतानाच तुमच्या गळ्याशी आल्यानंतर हे सगळं तुम्हाला आठवलं का? तुम्ही भाजपच्या नेत्यांवर आरोप केल्यावर मी शांत बसायचं हे कसं होईल? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक आहेत, हे सगळे भांबावून गेले आहेत. पक्षाच्या नेत्यांना बोललेले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. तसेच मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझा आणि राऊत किंवा पवार यांच्या बांधला बांध नाही. राऊतांना शेतीतील कळत नाही. त्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नाही. पण किरीट सोमय्या हे माझे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे माझे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्यावर आरोप केल्यावर मी बोलायचे नाही? असा सवालच पाटील यांनी राऊत यांना केला.

कोण अमोल काळे? त्यांच्यावर काय आरोप आहेत हे मला माहीत नाही. 27 महिने यांचे सरकार आहे, इतके वर्षे काय झोपा काढत होता काय? सरकारकडे तक्रार करावी. 27 महिने या गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी काळेप्रकरणावर केला. तसेच राजकारणात टीका करताना काय-काय शब्द काढतात? धमक्या काय देतात, असंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -