Monday, December 23, 2024
Homeजरा हटकेजय मल्हारची म्हाळसा रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस

जय मल्हारची म्हाळसा रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस

जय मल्हारमध्ये म्हाळसाची भूमिका सुरभी हांडे या मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे. सुरभी हांडे रिअल लाईफमध्ये फार सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ती सध्या लाईमलाईटमध्ये नसली तरी तिच्या फॅन्सना तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नक्कीचं आवडेल. या मालिकेत देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि ईशा केसकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका गाजली होती. या मालिकेनंतर सुरभी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत झळकली. तसंच ‘अग्गं बाई अरेच्चा 2’ या चित्रपटातही तिने छोटी भूमिका साकारली होती.

सुरभी एका नव्या मालिकेत झळकणार असल्याची माहिती समोर येतेय. सोशल मीडियावर ती ॲक्टीव्ह आहे. ती आधीपेक्षा आता खूप सुंदर दिसतेय. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर फोटोशूट, व्हिडिओ अपलोड करते. तिच्या लूकमध्येही बदल झाल्याचे दिसते. सुंदर फोटोशूट आणि अनेक व्हिडिओज तिच्या इन्स्टा हँडलला पाहायला मिळतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -