ताजी बातमी ऑनलाईन टीम
कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी आजही सुनावणी झाली. याप्रकरणी उद्या (दि. १८) सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तीवाद पूर्ण केला आहे. हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात सलग पाच दिवस सुनावणी सुरु आहे. आजच्या सुनावणीवेळी कर्नाटक उच्च न्यायालयाने
सामाजिक कार्यकर्ताव्दारा दाखल याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले की, तुम्ही या महत्वपूर्ण प्रकरणात न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवत आहात. याप्रकरणी विनोद कुलकर्णी यांची याचिका विचाराधीन आहे. त्यांनी न्यायालयात सांगितले की, हा मुद्दा मुस्लिम विद्यार्थींनीचे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहे. किमान शुक्रवारी तर शाळांमध्ये मुस्लिम विद्यार्थींना हिजाब परीधान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सहा विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या याचिकेवर युक्तीवाद करताना वकील ए. एम. डार यांनी सांगितले की, सरकारचा हिजाब बंदी निर्णय हा घटनेचे उल्लंघन करणार आहे. यावेळी न्यायालयाने डार यांना दाखल केलेली याचिका माघारी घेवून नवीन याचिका दाखल करण्याचे आदेश दिले
हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सहा विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या, त्यावर त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. याआधी एकसदस्यीय खंडपीठाने सुनावणी झाली होती. मात्र हा विषय संवेदनशील असल्याने मोठ्या पीठाकडे खटला वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी तातडीने त्रिसदस्यीय खंडपीठ स्थापन केले होते. हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने ११ फेब्रुवारी रोजी नकार दिला होता.