ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ सर्वेक्षणातून एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. पुरुषांपेक्षा दारु पिण्यात महिला आघाडीवर असल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालंय. गेल्या पाच वर्षात दारु पिणाऱ्या पुरुषांची संख्या घटली आहे. तर महिलांची संख्या वाढली आहे. NFHS म्हणजेच राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्य
सर्वेक्षणानं ओदिशाला घेऊन याबाबता एक अहवालच जारी केला आहे. या अहवालानुसार, ओदिशात 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दारुचं सेवन करणाऱ्या महिलांची संख्या 2015-16 मध्ये 2.4 टक्के होती. तीच संख्या 2020 21 मध्ये वाढून 4.3 टक्के इतकी झाली आहे. पुरुषांच्या बाबतीच हाच आकडा 2015 16 मध्ये 39..3 टक्के होता, तो आता कमी होऊन 28.3 टक्के इतका झाला आहे.
शहरातच फक्त दारुचं सेवन जास्त केलं जातं, असा एक समज असतो. पण हा समज चुकीचा असल्याचं NFHSच्या अहवालातून समोर आलं आहे. ओदिशाच्या ग्रामीण भागात 15 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुष आणि महिला दारु पिण्यात आघाडीवर आहेत. शहरांतील पुरुष आणि महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त दारु पितात, असंही समोर आलं आहे. शहरात 22.7 टक्के तर ग्रामीण भागात तब्बल 30. 2 टक्के महिला या दारु पितात, असं सर्वेक्षणातून समोर आलंय.
शहरातील दारु पिणाऱ्या पुरुषांची संख्या 32.2 वरुन 22.7 टक्क्यांवर आली आहे. तर महिलांची संख्या ग्रामीण भागात 4.9 तर शहरात 1.4 टक्के असल्याचं सर्वेक्षणात दिसून आलंय.
ग्रामीण महिलांमध्ये दारुच्या विक्रीचं प्रमाण हे वाढलंय. हे प्रमाण आधीधी 2.6 टक्के होतं. ते आता वाढून 4.9 टक्के इतकं नोंदवण्यात आलंय. पुरुषांच्या तुलनेत मात्र वेगळं चित्र दिसून आलं आहे. आधी 41.3 टक्के पुरुष दारु प्यायचे. हेच प्रमाण आता घटलं असून ते 30.2 टक्क्यावंर आलंय. दरम्यान, शहरातील महिलांच्या दारु सेवनाच्या बाबतीत फारसा फरक दिसून आलेला नाही. अवघ्या 0.1 टक्क्यांनी यात वाढ झाली आहे.
महिलांमध्ये फक्त दारु पिण्याच्या बाबतीतच वाढ झाली आहे, अशातला भाग नाही. तर तंबाखूच्या बाबतीतही हीच गोष्ट दिसून आलं आहे. 2015-16 च्या दरम्यान 17.3 टक्के महिलांना तंबाखू खायची सवय होती. आता हेच प्रमाण वाढून 26 टक्क्यांपर्यंत पोहोचलंय.
शहरात 16.6 टक्के महिला तंबाखूचं सेवन करतात. तर गावात 26 टक्के महिला तंबाखूचं सेवन करतात. तंबाखू खाण्याऱ्या पुरुषांची संख्याही कमी झाली आहे. 55.9 टक्के पुरुषांना जिथं तंबाखूचं आधी व्यसन होतं. त्याऐवजी आता 51.6 टक्के पुरुष तंबाखूचं सेवन करत असल्याचं दिसून आलं आहे.