Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रलग्न जुळत नसल्यानं तरुणानं जीवनयात्रा संपवली, सरण रचून आत्महत्या! महाराष्ट्र हादरला

लग्न जुळत नसल्यानं तरुणानं जीवनयात्रा संपवली, सरण रचून आत्महत्या! महाराष्ट्र हादरला

ताजी बातमी ऑनलाइन टीम
विवाह जुळत नसल्याने निराश झालेल्या एका शेतकरी तरूणाने स्वतःचे शेतात सरण रचून आत्महत्या केली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील पळशी खुर्द (ता.खामगाव) येथे गुरुवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली. महेंद्र बेलसरे (२८, रा. पळशी खुर्द) असे या तरूणाचे नाव आहे.

विवाह जुळत नसल्यामुळे काही दिवसापासून तो नैराश्यग्रस्त होता असे समजते. बुधवारी (ता. १६)चे रात्री महेंद्रने स्वतःचे शेतात लाकडाचे सरण रचून जाळून घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ व हळहळ व्यक्त झाली. महेंद्र हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

त्याचेकडे तीन एकर बागायती शेती असून गावातील इतर लोकांची दहा एकर शेतीसुद्धा ठेक्याने करीत होता. बुधवारी पळशी गावात दोन लग्नसोहळे होते. याचवेळी महेंद्रने स्वतःच्या शेतात लाकडाचे सरण रचले आणि अंगावर पेट्रोल ओतून सरणामध्ये उडी घेतली. यात त्याचा जळून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनेचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -