Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगनातीच्या मांडवात घराला आग ; भिंत खचली, चूल विझली, संसार खाक…!

नातीच्या मांडवात घराला आग ; भिंत खचली, चूल विझली, संसार खाक…!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लग्न सुरू असताना घराला आग लागली. अन् बघता-बघता सारे भस्म झाले. आगीने इतके रौद्र रूप धारण केले की, घरात काय सुरू आहे समजत नव्हते. त्यामुळे काही क्षणात घराची राख झाली.

आगीमध्ये घराचा पहिला आणि दुसरा मजला जळून खाक झाला. शिवाय छप्परही जळाले. त्यामुळे निवारा उडाला. एकीकडे मुलीच्या डोक्यावर अक्षता पडता होत्या, दुसरीकडे घर पेटले. यामुळे वऱ्हाडी मंडळींनी हलकल्लोळ केला. ऐन नातीच्या लग्नादिवशीच आजोबाचे घर जळून गेल्याने गावकरी आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आग लागल्याचे समजताच लग्नातील फोटोग्राफरसह वऱ्हाडी मंडळींनी घरातील सामान काढण्यासाठी मदत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -