Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रधावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न जीवावर, रेल्वे कर्मचाऱ्याचा धडकून मृत्यू

धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न जीवावर, रेल्वे कर्मचाऱ्याचा धडकून मृत्यू

धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न एकाच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चालत्या ट्रेनमधून  उतरण्याच्या नादात रेल्वे कर्मचाऱ्यालाच जीव गमवावा लागला. मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू झाला. वांद्रे येथून निजामुद्दीन एक्स्प्रेसने बोरिवलीला येत असताना हा अपघात घडला. बोरिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून त्यामध्ये रेल्वे कर्मचारी ट्रेनमधून पडतानाचा अंगावर काटा आणणारा क्षण कैद झाला आहे.

धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना रेल्वे कर्मचाऱ्यालाच प्राण गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्ती मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावरुन निजामुद्दीन एक्स्प्रेसने बोरिवलीला आली. बोरिवली येथे आल्यानंतर ते चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांचा हात ट्रेनच्या दांड्यावरुन सुटला नाही. त्यामुळे ते ट्रेनला धडकले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -