सलमान खान कुटुंबियांवरती किती प्रेम आहे हे अनेकांना माहिती आहे, त्याचबरोबर घरचे सुध्दा सलमान किती मदत करतात हे सुध्दा सलमानच्या अडचणीच्या काळात सगळ्यांनी पाहिले आहे. सलमान खानची बहिण अर्पिता तिची किती काळजी घेतो, लहान असल्यापासून दोघांमध्ये एक नात तयार झालं आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांची प्रचंड काळजी घेताना पाहायला मिळतात. नुकतंच अर्पिताने एक अलिशान घर 10 कोटी रूपयाला खरेदी केल्याचं समजतंय. लग्न झाल्यानंतर अर्पिता तिच्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. परंतु आता तिने स्वत:चं घर घेतल्याने तिची अधिक चर्चा आहे. तसेच खरेदी केलेलं घर करोडो रूपयांचं अलिशान घर आहे. त्यामुळे ते नेमकं कोणत्या परिसरात आहे याची उत्सुकता अनेकांना आहे.
घेतलेल्या घराची किंमत साधारण 10 कोटी रूपये असल्याचे समजते. तसेच खरेदी केलेलं घर मुंबईतल्या बांद्रा परिसरात खरेदी केलं असल्याचं समजतंय. कारण आत्तापर्यंत घराचे फोटो किंवा इतर कोणतीही माहिती अर्पिताने सोशल मीडियावर शेअर केलेली नाही. त्यामुळे त्याबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. अर्पिताचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीसोबत एका भाड्याच्या घरात राहत होती. ती राहत असलेल्या घराचं भाड देखील लाखाच्या घरात होतं. लग्नानंतर अर्पिताला दोन मुल देखील झाली आहेत. तसेच एका मुलाखतीत अर्पिताने माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे सोहेल खान आहे. कारण मी त्याच्यासोबत मोठी झाली आहे. त्यामुळे आमच्यात चांगले संबंध आहेत.