Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रमुलीच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी मृतदेह सापडला, बापाने जंगलात पुरला होता

मुलीच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी मृतदेह सापडला, बापाने जंगलात पुरला होता

दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. पुण्यातील घोडेगाव पोलिसांना तिचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. तहसीलदार रमा जोशी यांनी पंचनामा करुन तिचा मृतदेह बाहेर काढला. बेपत्ता मुलगी 17 वर्षांची होती. तिने आत्महत्या केली होती, मात्र मुलीचा सांगाडा वडिलांना तिच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी मिळाला. परंतु वडिलांनी कोणालाही माहिती न देता घोड नदीच्या लगत असलेल्या जंगलामध्ये पुरला होता. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी मागील सहा महिन्यापासून अपहरण झालेल्या किंवा बेपत्ता असलेल्या व्यक्ती, विशेषतः महिला आणि मुली यांच्या शोधाबाबत विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेदरम्यान आजपर्यंत एकूण 34 व्यक्तींना शोधण्यात घोडेगाव पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये 7 पुरुष, 14 महिला, एक मुलगा आणि 12 अल्पवयीन मुली यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -