Friday, September 20, 2024
Homeतंत्रज्ञानओप्पोची दमदार एंट्री ! पॉवरफुल प्रोसेसर असलेल्या एक्स 5 फोनची नवी सीरीज

ओप्पोची दमदार एंट्री ! पॉवरफुल प्रोसेसर असलेल्या एक्स 5 फोनची नवी सीरीज

ओप्पो आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे. या सिरीजचे नाव ओप्पो फाइंड एक्स 5 राहणार आहे. याअंतर्गत दोन स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. यात प्रो आणि स्टँडर्ड व्हेरियंट असेल. ही सिरीज 24 फेब्रुवारीला लाँच करण्याचे नियेाजन आहे. यापूर्वी होण्यापूर्वी एका वेबसाइटने त्याचे फिचर्सची माहिती ग्राहकांसाठी दिली आहे. ओप्पोच्या या आगामी मोबाईल स्मार्टफोन मध्ये ओप्पोने स्वतःचे एनपीयू, मारीसिलिकन एक्स वापरले आहे.

ओप्पोने माहिती दिलीयं, की ओप्पो फाइंड एक्स 5 प्रोमध्ये क्वलकॉमच्या स्नैपड्रैगन 8 Gen 1 चा वापर करणार आहे. तसेच, कंपनीने अलीकडेच प्रामुख्याने व्यावसायिक कॅमेरे तयार करत असलेल्या हेजेलब्लाड या स्वीडिश कंपनीशी भागीदारी केली आहे, कंपनी वन प्लस (OnePlus) या कंपनीच्या सहकार्याने फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी कॅमेरे देखील तयार करते. मात्र, ओप्पोने कॅमेरा सेटअपबद्दल अजून काहीही माहिती दिलेली नाही. ओप्पो फाइंड एक्स 5 आणि ओप्पो फाइंड एक्स 5 प्रो चीनच्या ‘टीना’ वेबसाइटवर लिस्टेड आहे, ज्यामध्ये मोबाईलबद्दल माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हा फोन चीनमध्ये उपलब्ध होणार असून भारतात तो कधी लाँच होईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, मोबाईलचे मॉडेल क्रमांक PFEM10 आणि PFFM10 आहेत, जे ओप्पो फाइंड एक्स मालिकेतील आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -