Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय घडामोडीठाकरेंविरोधात बोललात तर महागात पडेल, भाजप आमदार प्रशांत ठाकुरांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी

ठाकरेंविरोधात बोललात तर महागात पडेल, भाजप आमदार प्रशांत ठाकुरांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी

भाजप नेते किरीट सोमय्या आज अलिबागमधील कोर्लई गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. मात्र कोर्लई  गावात शिवसैनिकही मोठ्या प्रमणात गोळा झाले होते. कोर्लई ग्रामपंचायतीसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले. किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजप आमदार प्रशांत ठाकूर हेदेखील होते. सोमय्या आणि प्रशांत ठाकूर पंचायत समितीच्या कार्यालयात सरपंचांना भेटले. त्यानंतर प्रशांत ठाकूर बाहेर आले, तेव्हा शिवसैनिकांचा एक मोठा जमाव तिथे आला. यावेळी शिवसेने जिंदाबादच्या घोषणा सुरु झाल्या.

पंचायत समितीच्या कार्यालयातून बाहेर आलेल्या भाजप आमदार प्रशांत ठाकुर यांच्यासमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी आणि दमबाजीही करायला सुरुवात केली. ठाकरे कुटुंबियांविरोधात एक शब्दही बोललात तर महागात पडेल, असा दम काही शिवसैनिकांनी भरला. आमच्या नेत्याबद्दल वेडं-वाकडं बोललात तर आम्ही गप्प बसणार नाहीत..19 बंगले कुठे आहेत ते तुम्ही दाखवा.. असा दम शिवसैनिकांनी भरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -