ओळखीतून चित्रपटाला जाऊ असे म्हणून हडपसर येथील निर्जनस्थळी घेऊन जाऊन तेथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. तसेच तिचे न्युड फोटो व व्हिडिओ काढून ते मित्रांना दाखवून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
बेन अॅलेक्स बायना (वय १८, रा. एम जी रोड, कॅम्प) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२१ दरम्यान कॅम्पमध्ये तसेच हडपसर परिसरात घडला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला चित्रपट बघायला जाऊन असे सांगून जबरदस्तीने हडपसर येथील निर्जनस्थळी असलेल्या एका घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. तिला अश्लील कृत्य करायला लावले. त्यानंतर त्याने कॅम्पमधील गवळी वाडा येथे तिच्याबरोबर अश्लील कृत्य केले. त्याचे फोटो व व्हिडिओ काढले ते व्हिडिओ त्याने मित्रांना दाखविले.
परिसरात तिची बदनामी झाल्याने तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर तपास करीत आहेत.