Sunday, December 22, 2024
HomeनोकरीGood news ! आयटी क्षेत्रात मार्चपर्यंत ३.६ लाख नवीन लोकांना रोजगार

Good news ! आयटी क्षेत्रात मार्चपर्यंत ३.६ लाख नवीन लोकांना रोजगार

जर तुम्ही आयटी क्षेत्रात{ it sector } आहात तर तुमच्यासाठी एक खास खबर आहे. पुढच्या दीड महिन्यात आयटी क्षेत्रात ३.६ लाख नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे. अनअर्थइनसाइट ( UnearthInsight) ने आपल्या रिपोर्टमध्ये (report) तसं म्हणटलं आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार आयटीच्या कंपन्या मार्चअखेरपर्यंत 3.6 लोकांना नोक-या देणार आहे. आयटीतल्या अनेकांनी ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात नोकरी सोडण्याचा दर 22.3 टक्के एवढा आहे. तर जुलै आणि सप्टेंबर दरम्यान 19.5 टक्के एवढा आहे, तर जानेवारी ते मार्च दरम्यान 22 ते 24 टक्के राहिल असा अनुमान लावण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात देखील आयटी क्षेत्रात वाढीच्या मार्गावर आहे. कोरोनाचा कसलाही परिणाम आयटी क्षेत्रावर झालेला नाही. त्यामुळे आयटी उद्योगाची वाढ सुरूच राहिलं असं वाटतंय असं मत अनर्थइनसाइटचे संस्थापक आणि सीईओ गौरव वासू यांनी व्यक्त केले आहे.
पगाराचा उच्चांक वाढता

कोरोनाच्या काळात देखील आयटी क्षेत्र आघाडीवर असल्याने कर्मचा-यांचे पगार देखील चांगले राहिलेले आहेत. तसेच ते वाढत राहतील असा अंदाज अनर्थइनसाइटचे संस्थापक आणि सीईओ गौरव वासू यांनी व्यक्त केला आहे.
आयटीक्षेत्र महसूलात अग्रस्थानी येईल

कोरोनाच्या संसर्गाचा कसलाही परिणाम आयटी क्षेत्रावरती झालेला नाही. त्यामुळे आयटीतील लोकांचे पगार वाढले आहेत आणि आयटीक्षेत्र महसूलात अग्रस्थानी येईल. शिवाय मोठ्या कंपन्यामध्ये नोक-या देखील मिळणार आहेत. चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्राच्या महसुलात 19-21 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे. सध्याचं स्थान हे इतिहासातील सर्वीच्छ स्थान असल्याचं अनर्थइनसाइटचे संस्थापक आणि सीईओ गौरव वासू म्हणतात.
50 लाखांपेक्षा अधिक लोक आयटीक्षेत्रात

सगळीकडे आता आयटी क्षेत्रातील सेवांची गरज असल्याचे दिसून येते.य कारण कोरोनाने तुम्हाला ऑनलाईन आयुष्य जगायचं शिकवलं त्यामुळं या क्षेत्रात 15.5 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मागच्या एक दशकाहून अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळं आयटी क्षेत्रातील महसूल 227 अरब डॉलरपर्यंत पोहोचला आहे. कोरोनामुळे या क्षेत्राला अधिक चांगलं महत्त्व प्राप्त झालं असून या क्षेत्रात 50 लाख लोक काम करतात. नेमकॉमच्या म्हणण्यानुसार पुढची काही वर्ष आयटीक्षेत्र आघाडीवर राहिल. या उद्योगाचा आकार 2026 पर्यंत $350 अब्ज होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -