Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवजयंतीची तयारी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवजयंतीची तयारी

रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्याि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार तमाम शिवभक्त, इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून इतर सण-उत्सवांप्रमाणेच शिवजयंतीही अत्यंत साधेपणाने आणि प्रतीकात्मक पद्धतीने साजरी करण्यात आली होती. कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे लोकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती जल्लोषात साजरी करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी चौक, निवृत्ती चौक, शिवाजी विद्यापीठासह ठिकठिकाणच्या शिवछत्रपतींच्या स्मारक परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. भगव्या पताका, भगवे ध्वज यांनी परिसर सजविण्यात आला आहे. अनेक संस्था-संघटनांच्या वतीने चार-पाच दिवसांच्या सोहळ्याचे आयोजन केले असून शिवशाहिरांचे पोवाडे, इतिहास संशोधकांची व्याख्याने, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, शिवज्योतीचे आयोजन यासह विविध सामाजिक, पर्यावरणपूरक, शैक्षणिक, आरोग्यदायी व लोकोपयोगी उपक्रमांचे नियोजन केले आहे.

शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास विविध संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. 19 रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी पारंपरिक जन्मकाळ सोहळा व अभिवादन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -