Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रअतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन...

अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात

डोंबिवलीतील दावडी परिसरात राहत्या घरातील सोफा कम बेडमध्ये सोफा-कम-बेडमध्ये मृतदेह आढळलेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. 33 वर्षीय सुप्रिया शिंदे या विवाहित महिलेची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. पुस्तक देण्याच्या बहाण्याने शेजारील इमारतीत राहणारा विशाल घावट शिंदेंच्या घरात शिरला. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता सुप्रिया यांनी प्रतिकार केला. यामुळे विशालने सुप्रिया यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला होता, मात्र काहीच सुगावा नसल्याने आरोपी शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं. हत्या झाली त्या वेळी सुप्रिया यांच्या घराबाहेर चपला असल्याची माहिती तपासा दरम्यान साक्षीदारांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही चप्पल कुणाची, हे शोधून काढत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सुप्रिया शिंदे यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कोणताही सुगावा नसल्याने हत्या का आणि कुणी केली, हे समजत नव्हते. आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते. तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचं पोलिसांना सांगितलं. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत चप्पल कोणती, हे निष्पन्न केलं. अखेर शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट याची चप्पल असल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -