मिरज/ प्रतिनिधी
मिरज नदीवेस वैरण बाजार जवळमटका घेताना पोलिसांनी दोन जणांना अटक करून 46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की मिरज येथील नदीवेस वैरण बाजार जवळ नाइस जेंट्स पार्लर शेजारी असलेल्या गाळ्यामध्ये आरोपी रिजवान मिनाजुद्दिन शिकलगार वय 24 वर्षे राहणार शास्त्री चौक पिरजादे प्लॉटमिरज व रोहन राजाराम यादव, वय 20 वर्ष , राहणार शास्त्री चौक , पिरजादे प्लॉट हे दुपारी चारच्या सुमारास मटका घेत असताना पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम बाराशे रुपये,2 माऊस,2 सीपीयू ,कम्प्युटर कीबोर्ड , वाय-फाय राऊटर असा एकूण 46 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी आरोपी रिजवान शिकलगार व रोहन यादव यांच्याविरुद्ध सोहेल बालम कार्तीयांनी वय 32 वर्षे पोलीस कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून मिरज शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
वैरण बाजार जवळ मटका घेताना दोघांना अटक..!46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त:-
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -