Sunday, December 22, 2024
Homeनोकरीआताच अर्ज करा, सिव्हिल सेवा परीक्षेत सहभागी होण्यासाठी ही आहे शेवटची तारीख

आताच अर्ज करा, सिव्हिल सेवा परीक्षेत सहभागी होण्यासाठी ही आहे शेवटची तारीख

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. यंदा या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदाही नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी तात्काळा अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच उमेदवारांना हवे असल्यास ते विहित मुदतीत अर्ज मागेही घेऊ शकतात.

ज्या उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेत सहभागी व्हायचे आहे ते अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. हे लक्षात घ्या की अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे. तसेच उमेदवार 1 मार्च ते 7 मार्च 2022 पर्यंत त्यांचा अर्ज मागे घेऊ शकतात. यासाठी प्रिलिम्स परीक्षा 5 जून 2022 रोजी घेतली जाईल. प्रिलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकतील.

एवढ्या पदांवर केली जाणार भरती
UPSC Civil Services Exam 2022 द्वारे 1011 पदांची भरती केली जाईल. यापूर्वी रिक्त पदांची संख्या 861 होती. मात्र गुरुवारी आयोगाकडून 150 पदांची वाढ करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या भरती संदर्भात किंवा परीक्षेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल ते उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेशी संबंधित इतर सविस्त माहिती मिळवू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -