Wednesday, January 14, 2026
Homeराजकीय घडामोडीआदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

राज्यात सगळीकडे सध्या शिवजयंतीचा उत्साह आहे. सगळीकडील वातावरण भगवं झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. त्यामुळे शिवभक्तांचा आनंद द्विगुणीत होतो. आज औरंगाबादेतही शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. सुरूवातीला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलंय. पालकमंत्री सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांची उपस्थिती यावेळी औरंगाबादेत पहायला मिळाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, मंत्री अब्दुल सत्तार, बाळासाहेब थोरात, असे अनेक नेते पुतळ्याच्या अनावरणाला उपस्थित होते. औरंगाबादेतला हा पुतळा अत्यंत भव्य असा आहे. या पुतळ्याला यावेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या पुतळ्यामुळे औरंगाबादच्या वैभवात आणखी वाढ झाली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -