सद्यस्थितीत राज्यात सर्वाधिक घरफाळा कोल्हापूर महापालिकेच्या वतीने आकारला जात आहे. शहरातील नागरिकांवर गेल्या दहा वर्षांपासून भांडवली मूल्याच्या घरफाळ्यातून आर्थिक भुर्दंड बसविण्यात आला आहे. मुळातच घरफाळा जास्त असल्याने पुन्हा त्यात वाढ केल्यास अन्याय होईल.
परिणामी, यापुढे कोणत्याही स्थितीत घरफाळ्यात वाढ करू देणार नाही, असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी गटनेता शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर भूपाल शेटे, अर्जुन माने व इतर पदाधिकार्यांनी दिला. दरम्यान, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अशी कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.