Sunday, December 22, 2024
Homeनोकरीबेरोजगारांसाठी सुवर्ण संधी: रेल्वेच्या या सेवेचा उपयोग करून कमावा हजारो रुपये

बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी: रेल्वेच्या या सेवेचा उपयोग करून कमावा हजारो रुपये

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने बेरोजगारांसाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे. याअंतर्गत रेल्वे तिकीट बुकींग एजंटसह अनेक सेवा देण्यात येत आहे. रेल्वे तिकिट एजन्ट सेवेचा फायदा घेऊन तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. यासाठी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना तिकिट खिडकीतून जसे तिकीट दिले जाते त्याच पध्द्तीने एजंटला प्रवाशांना तिकीट द्यावे लागणार आहे. यातून तुम्हाला हजारो रुपये कामवण्याची संधी मिळणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तिकीट एजंट व्हावे लागले.

प्रत्येक तिकिटामागे मिळेल कमिशन
रेल्वे तिकीट एजंट होण्यासाठी तुम्हाला अधिकृतरित्या अर्ज करावा लागेल. यासाठी IRCTC च्या अधिकृत संकृतस्थळावर जाऊन ऑनलाईन तिकीट एजंटसाठी अर्ज करता येईल. तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला रेल्वेचे अधिकृत तिकीट एजंट होता येईल. त्यानंतर तुम्ही प्रवाशांचे तिकीट बुक करू शकता. तिकीट बुकिंगवर एजंटला कमिशन दिले जाते.

तिकीट बुक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही
नॉन-एसी कोचाच्या तिकीट बुकिंगवर प्रति तिकीट 20 रुपये तर एसी क्लासच्या तिकीट बुकिंगसाठी 40 रुपये कमिशन मिळेल. तसेच तिकीट बुक केल्यानंतर तिकिटाच्या किमतीच्या एक टक्का कमिशन एजंटला दिले जाते. यात तिकीट बुक करण्याची कोणताही मर्यादा नाही. बेरोजगार तरुणांसाठी रल्वेने ही सेवा सुरू केली आहे.

रेल्वेची ही सुविधा बेरोजगार तरुणांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरु शकते. बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन IRCTC ने ही सेवा सुरू केली आहे. एका वर्षासाठी एजंट बनण्यासाठी तुम्हाला IRCTC ला 3,999 रुपये इतके शुल्क भरावे लागेल, तर दोन वर्षांसाठी 6,999 रुपये शुल्क आहे. तसेच एका महिन्यात 100 तिकीट बुक करण्यासाठी 10 रुपये शुल्क द्यावे लागेल. तुम्ही 101 ते 300 तिकिटे बुक केली तर 8 रुपये प्रति तिकीट शुल्क द्यावे लागेल. महिन्याला 300 पेक्षा जास्त तिकीट बुक करण्यासाठी प्रति तिकीट फक्त 5 रुपये मोजावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही अमर्याद तिकीट बुक करून हजारो रुपये कमावू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -