शिरोली येथील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. अशी फिर्याद फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलिसात दाखल झाली आहे. ही फिर्याद मुलीच्या आत्याने दिली आहे.
शिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रीणीच्या घरी अभ्यासासाठी जातो असे सांगून १५ फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेली त्यापासून घरी परत आलीच नाही. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. पण ती सापडली नसल्याने मुलीच्या आत्याने तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असल्याचे अंदाज व्यक्त केला आहे.
ही मुलगी वयाने १४ वर्षाची असून रंगाने निमगोरी, चेहरा गोल, नाक मोठे बसके, उंची ५ फूट, केस काळे लांब, अंगात निळ्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगिन्स पॅन्ट, काळ्या रंगाचा सनकोट शाळेचे दप्तर, मराठी बोलते. अशा वर्णनाच्या मुलीसंबधी कोणास माहीती असल्यास शिरोली पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.