ताजी बातमी ऑनलाईन टीम
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर नुकतेच विवाह विवाहबंधनात अडकले. खंडाळा येथील एका समारंभात त्यांचे लग्न झाले. सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्याची अनेक छायाचित्रे व्हायरल होत आहेत.
ज्यात शिबानी लाल फिशटेल गाऊनमध्ये आहे. तर फरहानने काळ्या रंगाचा सूट घातला आहे.
याबद्दल सोशल मीडियावर त्याचे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मात्र, काही यूजर्सनी फोटो पाहून शिबानी प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर कमेंटमध्ये तिच्या बेबी बंपचा उल्लेखदेखील केला आहे. काही युजर्सनी म्हटले आहे की, ‘समझ नहीं आ रहा शादी के लिए बधाई दें, या प्रेग्नेंसी के लिए’. एकाने म्हटले आहे, काय ती अपेक्षित करत आहे का ? तर एका युजर्सने ‘ये तो प्रेग्नेंट है’ अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या आहेत.
अभिनेत्री शिबानीचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो हे दुरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे लांबून तिचा बेबी बंप दिसत आहे. तिचे दुसऱ्या अॅंगलचे फोटो बघितले तर, शिबानी येथे स्लिम ट्रिम दिसते . त्यामुळे अभिनेत्री शिबानी दांडेकर प्रेग्नेंट असल्याचा युजर्सचा गैरसमज झाला आहे.
लग्नात या बॉलीवूड कलाकारांची हजरी
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नात, त्याचे जवळचेच नातेवाईक होते. तसेच बॉलीवूडमधील हृतिक रोशन त्याचे आई-वडील राकेश रोशन आणि पिंकी रोशनसोबत उपस्थित होते. याशिवाय आशुतोष गोवारीकर, संगीतकार एहसान नूरानी, रिया चक्रवर्ती, अनुषा दांडेकर या बॉलीवूड कलाकारांनीही विवाह सोहाळ्याला हजरी लावली.