ताजी बातमी ऑनलाईन टीम
सीबीएसई 2021-22 च्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी टर्म 1 चा निकाल आज जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. CBSE टर्म 1 च्या परीक्षा (CBSE Term 1 exams) नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये झाल्या होत्या. CBSE 10वी आणि 12वीच्या निकालाची तारीख आणि वेळ (CBSE 10th and 12th result date and time) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तरी सूत्रांनी दिलेल्या
माहितीनुसार या आठवड्यात 10वी, 12वीचे दोन्ही निकाल जाहीर होणार आहेत. दहावी, बारावी या दोन्ही वर्गांसाठी टर्म 1 चे निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता (CBSE Term 1 Result 2021 Updates) आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि निकालांच्या अपडेटसाठी अधिकृत वेबसाइट फॉलो करण्याचा सल्ला दिला देण्यात येत आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर 10वी आणि 12वीची स्कोअर कार्डे अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in, cbseresults.nic.in वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. बोर्डाच्या वेबसाइट्सव्यतिरिक्त 10वी, 12वीचे निकाल तपासण्याच्या इतर अधिकृत मार्गांमध्ये डिजिलॉकर अॅप आणि वेबसाइट- digilocker.gov.in यांचा समावेश आहे. CBSE टर्म 2 परीक्षेच्या दृष्टीने बोर्डाने अलीकडेच डेटशीट अधिसूचना जारी केली आहे. CBSE टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेत ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव असे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जाऊ शकतात.
1. विद्यार्थ्यांना टर्म 2 परीक्षेनंतर त्यांची फायनल मार्कशीट आणि निकाल मिळेल. टर्म 1 च्या मार्कशीटमध्ये फक्त त्यांना वेगवेगळ्या विषयात मिळालेल्या गुणांचा उल्लेख असेल.
2. टर्म 1 च्या निकालाला CBSE च्या अंतिम निकालात किमान 50 टक्के महत्त्व असेल.
3. इयत्ता 10वी आणि 12वी च्या टर्म 1 च्या परीक्षेत कोणताही विद्यार्थी नापास होणार नाही.