ताजी बातमी ऑनलाईन टीम
आजही आरोग्यासाठी अनेक लोक गुणकारी म्हणून कोरफड खातात. पण कोरफड खाण्याचे नुकसानही असून आज आम्ही तुम्हाला कोरफड खाल्यावर नक्की काय नुकसान होऊ शकते याबद्दलची माहिती सांगणार आहोत.
कोरफडीचे फायदे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण तेवढेच त्याचे नुकसानही आहेत. कोणाला याबद्दल फारसे माहीत नसते. कर्करोगासारखा आजारही कोरफडीमुळे होऊ शकतो. कसा होऊ शकतो कर्करोग याबद्दल थोडे जाणून घेऊया.
सर्वात सुंदर ब्युटी प्रोडक्ट कोरफड हे ओळखले जाते. आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून अनेक लोक कोरफड खातातही. कोरफडीच्या रसात एन्थ्रोक्विनोन असते. तुम्हाला कोरफड खाल्यामुळे हगवण किंवा अल्सर होऊ शकतो. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकते.
त्याचबरोबर पोटाचे विकारही होऊ शकतात. कोरफड खाल्यावर अनेकदा त्वचेला खाज येते आणि छातीतही दुखू शकते. अनेकदा कोरफड पौष्टिक म्हणून गरोदर महिलाही ती खातात. पण त्याचा उलट परिणाम होऊन गर्भाची वाढ होण्यापेक्षा ते संकुचित पावते. कोरफड हृदयाचा विकार असणाऱ्यांनी कधीच खाऊ नये.