Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रगर्भवती विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, पोटावर बॅग मारल्याने गर्भपात, खळबळजनक प्रकार

गर्भवती विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, पोटावर बॅग मारल्याने गर्भपात, खळबळजनक प्रकार

हुंड्यासाठी छळ करत गर्भवती विवाहितेच्या पोटावर बॅग मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावती शहरातील पांढुरणा भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. लग्नानंतर जेमतेम दीड महिन्यात हा प्रकार घडला आहे. पतीशिवाय सासरच्या चौघा जणांनी पीडित महिलेचा छळ केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे पोटावर बॅग मारल्याने महिलेचा गर्भपात झाल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक कलहातून अमरावतीच्या धारणीमध्ये एका विवाहितेला तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी डिझेल टाकून जिवंत पेटवून दिल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा हुंड्यासाठी एका गर्भवती महिलेचा छळ झाल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातच समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हुंड्यासाठी पतीच्या शिवाय सासरच्या इतर चार जणांनी पीडित महिलेचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे. तिच्या पोटावर बॅग मारल्याने तिचा गर्भपात देखील झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -