आयकर (Income Tax) अपीलीय न्यायाधिकरणाने खाजगी सचिव नियुक्त करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. 34 रिक्त पदांसाठी आयकर विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेले पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची 11 एप्रिल 2022 ही अंतिम तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट https://itat.gov.in/ला भेट द्यावी लागेल.
लक्षात ठेवा की, अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत आयकर अधिसूचनेत नमूद केलेल्या सर्व आवश्यक पात्रता असणे महत्त्वाचे आहे. आयकर अपीलीय न्यायाधिकरण भरती 2022 अधिसूचना वयोमर्यादा, पगार इत्यादी तपशील येथे तपासा.
पदांचा तपशील –
संस्थेचे नाव – आयकर अपील न्यायाधिकरण
पदाचे नाव – खाजगी सचिव
पदांची संख्या – 34 पदं
नोकरी वर्ग – केंद्रीय सरकारी नोकऱ्या
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु -12 फेब्रुवारी 2022.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2022.
पगार –
निवड झालेल्या उमेदवारांना 9,300 ते 34,800 पर्यंत पगार मिळेल.
नोकरीचे ठिकाण –
उमेदवारांना देशभरातून कुठेही नोकरी मिळू शकते.
पात्रता –
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)