आरबीआयने मार्च 2022 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. मार्च महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध झोनमध्ये एकूण 13 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे मार्चमध्ये बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर शाखेत जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्टीची यादी नक्कीच जाणून घ्या.
मार्च महिन्यात महाशिवरात्री आणि होळी हे दोन मोठे सणही साजरे केले जाणार आहेत. तसेच भारतात मार्च हा आर्थिक वर्षाचा आणि चौथ्या तिमाहीचाही शेवटचा महिना असतो. त्यामुळे या महिन्यात बँकांशी संबंधीत अनेक व्यवहार केले जातात. लोकांना बँकिंग, इंव्हेस्टमेंट आणि आयकराशी संबंधित अनेक कामांसाठी बँकांमध्ये जावे लागू शकते. त्यामुळे या महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद असतील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
यंदा मार्चमध्ये बँकांना एकूण 13 दिवसांच्या सुट्ट्या आहेत. यातील 6 सुट्ट्या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रविवार आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या आहेत. तर काही सुट्ट्या या विविध राज्यातील सण आणि उत्सवांमुळे असणार आहे. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत.
1 मार्च : महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.
3 मार्च : लोसार निमित्त गंगटोक येथे बँका बंद राहणार.
4 मार्च : चपचार कुट निमित्त आयजोलमध्ये बँकांना सुट्टी.
6 मार्च : रविवार, बँकांना साप्ताहिक सुट्टी.
12 मार्च : महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील.
13 मार्च : रविवार, बँकांना साप्ताहिक सुट्टी.
17 मार्च : होळी निमित्त देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांची झोनमध्ये बँकांना सुट्टी.
18 मार्च : होळी/डोल जत्रा निमित्त बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता इतर सर्व झोनमध्ये बँका बंद राहतील.
19 मार्च : होळी/ओसांगचा दुसरा दिवस, भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे बँकांना सार्वजनिक सुट्टी.
20 मार्च : रविवार, बँकांना साप्ताहिक सुट्टी.
22 मार्च : बिहार दिवस निमित्त पाटणा झोनमद्ये बँका बंद.
26 मार्च : महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील.
27 मार्च (रविवार) : रविवार, बँकांना साप्ताहिक सुट्टी.