शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते जिल्ह्यातील (कोल्हापूर) आठ कार्यक्रम आणि बैठकांना उपस्थित असणार आहेत. तसेच अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. आदित्य ठाकरे यांनी अंबाबाई दर्शन घेतल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
काल मंत्री आदित्य ठाकरे यांनी नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले होते.