केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान
योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. लवकरच सरकार शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याची भेट देणार आहे. मात्र त्याआधी हे लक्षात घ्या की, पुढचा हप्ता येण्यापूर्वीच सरकारने या योजनेत 2 मोठे बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच लाभार्थ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले होते आणि आता राज्यातील तपासणीची पद्धतही बदलली आहे.
यापूर्वी, पीएम किसान पोर्टलला भेट देऊन, कोणीही त्यांच्या हप्त्याच्या स्टेट्सबद्दलची माहिती मिळवू शकत होता, मात्र आता त्याचे नियम बदलले आहेत. आता नव्या बदलांमुळे, तुम्ही पीएम किसान पोर्टलवर मोबाईल नंबरवरून तुमचे स्टेट्स पाहू शकणार नाही. आता तुम्ही फक्त तुमच्या आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबरवरून स्टेट्स जाणून घेऊ शकाल.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांनी e-KYC पूर्ण केल्यानंतरच 11वा हप्ता मिळेल. सरकारने या योजनेत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही e-KYC न केल्यास तुमचा 11 वा हप्ता अडकू शकतो.
सरकारने या योजनेत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही e-KYC न केल्यास तुमचा 11 वा हप्ता अडकू शकतो.
e-KYC ची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा. उजव्या बाजूला अनेक प्रकारचे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर मागितलेले तपशील भरा. e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.