Wednesday, July 23, 2025
Homeब्रेकिंगआनंदाची बातमी! 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Corbevax लसीच्या वापराला DCGIने...

आनंदाची बातमी! 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Corbevax लसीच्या वापराला DCGIने दिली मान्यता!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कोरोना विषाणूने (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे. कोरोची पहिली लाटेपासून (First Wave Of Corona) ते तिसऱ्या लाटेपर्यंत (Third Wave Of Corona) लागण होणाऱ्यांची संख्या आणि मृतांचा आकड्याने उच्चांक गाठला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.

कोरोनापासून (Covid 19) बचाव करण्यासाठी सरकारने जोरदार लसीकरण (Corona Vaccination) मोहीम राबवली त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. पण या कोरोनाच्या विळख्यात लहान मुलं देखील सापडत आहेत. अशामध्ये आता 12 वर्षांवरील मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

12 वर्षांवरील मुलांसाठीच्या Corbevax या लसीच्या आपत्कालीन वापराला सरकारने मान्यता दिली आहे. हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल ई’ (Biological E) कंपनीने ‘कॉर्बेवॅक्स’ (Corbevax) या लसीची निर्मिती केली आहे. या लसीला औषध नियामक प्रशासनाने (DCGI) सोमवारी आपत्कालीन वापरला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे. याआधी भारतात 15 वर्षांवरील मुलांना लस दिली जात होती. आता 12 वर्षांवरील मुलांना देखील लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Corbevax ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -