Wednesday, July 23, 2025
Homeराजकीय घडामोडीसत्ता गेल्यापासून फडणवीस नैराश्यात, त्यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही

सत्ता गेल्यापासून फडणवीस नैराश्यात, त्यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजलमधील वाद विकोपाला गेला आहे. त्याच दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्यापासून फडणवीस हे नैराश्यात आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. कारण त्यांना सत्ता गेल्यापासून खूप नैराश्य आले आहे. त्यामुळे ते बोलत असतात. त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

ते पुढे म्हणाले, गेले दोन महिने बघत असाल, उत्तर प्रदेशातील बेरोजगारी, तिथल्या समस्या तसेच तेथील कोरोना परिस्थिती हाताळण्यात भाजप अपयशी ठरले आहे. त्यामुळे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधी पक्ष वाटेल ते आरोप करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -