Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रपत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध हे क्रौर्यच, कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध हे क्रौर्यच, कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा नागपुरातील कोर्टाने दिला आहे.विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला न्यायालयाने संमती दिली. 22 वर्षीय विवाहितेने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पतीला दारुचे व्यसन असून सेक्स करण्यास नकार दिल्यावर तो बळजबरी करायचा, असा आरोप पीडितेने केला होता. हात-पाय बांधून नवरा आपल्याला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडायचा, तसेच आरडाओरडा करु नये, म्हणून तोंडात कापडाचा बोळाही कोंबायचा, असा दावा पीडित तरुणीने अर्जात केला होता. त्यानंतर विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला संमती देत न्यायालयाने तिला दिलासा दिला आहे.

पत्नीची इच्छा नसताना तिचे हात-पाय बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा देत नागपूर कौटुंबिक न्यायालयाने विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला दिली संमती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -