Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे गुण..!

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे गुण..!

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. कोटोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने तयारी सुरू केली आहे. दुसटीकडे विद्यार्थीही जोमाने अभ्यासाला लागले आहेत..
कोटोना संकटामुळे गेली दोन वर्षे शाळामहाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्याथ्र्यांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवण्यात आला. मात्र, त्यात सगळ्याच विद्याथ्र्यांचे शिक्षण होऊ शकलेले नाही. विद्याथ्यांची मोठे नुकसान झाले.. विद्याथ्यांची झालेली हानी भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या विद्याथ्र्यांना ‘गूड न्यूज’ दिली आहे. ती म्हणजे, क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाया विद्याथ्र्यांना या पटीक्षेत मोठा फायदा होणार आहे. विविध स्पर्धांच्या आधारावर विद्याथ्र्यांना या पटीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावी-बारावीच्या पटीक्षा आता तोंडावर आलेला असतानाच, हा निर्णय घेण्यात आल्याने मैदानात घाम गाळणाया विद्याथ्र्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.. काही विद्यार्थी खेळासाठी बटाच काळ मैदानात असतात. त्यामुळे इतर विद्याथ्र्यांच्या तुलनेत त्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळतो. ही बाब लक्षात घेऊन या विद्याथ्र्यांना शिक्षण विभागाने सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेला बसणाया विद्याथ्र्यांसाठी तो सातवी व आठवीत असताना झालेल्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सवलतीचे क्रीडा गुण मिळतील. – बारावीच्या विद्याथ्र्यांच्या बाबतीत नववी व दहावीतील विद्याथ्र्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन क्रीडा सवलतीचे गुण मिळणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना तसे निर्देश दिल्याची माहिती शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, दहावी, बारावीच्या परीक्षा सरक्षित वातावरणात, कोविड नियमांचे पालन करून घेण्यावर राज्य शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पटीक्षांची जोरदार तयाटी सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -