सध्या सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते लवकर खरेदी करा. 2022 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,000 रुपयांच्या वर जाऊ शकतो, असा अंदाज मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज सोन्याचा भाव 0.76 टक्क्यांनी मजबूत होत आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सोन्या-चांदीचा भाव एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.76 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 50,460 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 1.10 टक्क्यांच्या उसळीसह 64,289 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.
मुंबई -22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,460 रुपये
नागपूर – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,460 रुपये
पुणे – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,150 रुपये 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,350 रुपये