डाॅन, भाई, अण्णा… अशी बिरुदावली मिरवत गुन्हेगारीविश्वात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि आपापल्या परिसरात दहशत माजविण्यासाठी शालेय वयातील विद्यार्थी सध्या मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहेत. आता ही मुलं आपली दहशत आणि गुंडागर्दी प्रस्थापित करण्यासाठी सोशल मीडियाचा जबरदस्त वापर करत आहेत. त्यांच्यावर उजैनच्या खून झालेल्या दुर्लभ कश्यपचा प्रचंड प्रभाव आहे. हा दुलर्भ ज्या पद्धतीने आपल्या दहशतीची हवा सोशल मीडियावर करायचा, नेमकं त्याच पद्धतीने औरंगाबादमधील मुलांनी आपली हवा केली आहे. यांचा आदर्श कोण… त्यांनी हे कृत्य करण्याची प्रेरणा कुठून घेतली… कोण आहे हा दुर्लभ कश्यप
दुर्लभ कश्यप हा उजैनचा कुख्यात गुंड. सर्वात लहान गुंड म्हणून त्याला ओळखलं जातं. गुन्हेगारी क्षेत्रात वयाच्या १६ व्या वर्षी आला होता. सोशल मीडियावर त्याची चांगलीच हवा होती. सिगारेट ओढणं, हुक्का ओढणं, त्याचा धूर हवेत सोडणं, हत्यारांसहीत फोटो पोस्ट करणं, इतकंच नाही तर त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये खुल्यापणाने लिहिलं होतं की, “कुख्यात बदमाश+हत्यारा+पिवर अपराधी+कोणसाभी और कैसाभी विवाद करना हो तो मुझे संपर्क करे!!!”, अशा पद्धतीने त्यानं उघडपणाने सुपारी घेत असल्याची जाहिरात केलेली होती.
फेसबुकवरून खुनाच्या सुपारीची जाहिरात करणारा दुर्लभ कश्यप आहे तरी कोण?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -