Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगडीए थकबाकीबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढणार!

डीए थकबाकीबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढणार!

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी  एक आनंदाची बातमी आहे. जे कर्मचारी त्यांच्या डीए  थकबाकीची वाट पाहत आहेत त्यांना 18 मार्च 2022 रोजी होळीपूर्वी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार 1 जानेवारी 2022 पासून महागाई भत्त्यात  3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. सर्व कर्मचार्‍यांना मार्चमध्ये पूर्ण थकबाकीसह  पगार मिळण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार सर्व कर्मचार्‍यांना मार्चमध्ये पूर्ण पगार मिळेल. या पगारात  जानेवारी आणि फेब्रुवारीच्या डीएच्या थकबाकीचा समावेश असेल.

झी बिझनेसच्या एका रिपोर्टमध्ये पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की जेसीएमच्या (JCM) राष्ट्रीय परिषदेचे शिव गोपाल मिश्रा यांनी म्हटले आहे की लेव्हल -1 कर्मचार्‍यांची डीए थकबाकी 11,880 ते 37,554 रुपये आहे. लेव्हल-13 (7वी CPC बेसिक पे स्केल रु 1,23,100 ते रु 2,15,900) किंवा लेव्हल-14 (वेतन स्केल) वरील कर्मचार्‍यांची DA थकबाकी अनुक्रमे रु. 1,44,200 आणि रु 2,18,200 असेल. विशेष म्हणजे, सध्या एकूण महागाई भत्ता (DA) 31% आहे. तो तीन टक्क्यांनी वाढून 34% पर्यंत वाढवला जाऊ शकतो. ही वाढ केंद्र सरकारने डीए 3 टक्के वाढवून 34 टक्के केल्यास होऊ शकते.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वर्षातून दोनदा जानेवारी ते जुलै दरम्यान अपडेट केला जातो. DA ची गणना सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराला मूळ वेतनाने गुणाकार करून केली जाते.

सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जातो. कर्मचार्‍यांना त्यांच्या राहणीमानाच्या खर्चात मदत करण्यासाठी तो दिला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -