मिरज/ प्रतिनिधी
मिरची हॉटेल मिरज येथे चाकूचा धाक दाखवून रिक्षा व मोबाईल असा दोन लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्त चोरून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार आहे.याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राहुल हिंदुराव जाधव वय 36 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी देवताळे मिरज व त्याचा मित्र प्रशांत पोतदार हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा नंबर MH 10 CQ 0881 घेवून हॉटेल मिरची समोर रोडवर आले असता आरोपी विशाल सुभाष घोडके वय 22 वर्षे राहणार कुंकू वाले गल्ली मंगळवार पेठ मिरज व जावेद शेख राहणार मिरज यांनी चाकूचा धाक दाखवून रिक्षा व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते.याबाबत पोलिसात गुन्हा नोंद झाला होता.महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे,प्रमोद खाडे,सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष पाटील,उदय कुलकर्णी , सचिन कुंभार,चंद्रकांत गायकवाड , बाळासाहेब निळे,बसवराज कुंदगोळ , गणेश कोळेकर,चालक सहाय्यक पोलीस फौजदार पाटील यांच्या पथकाने आरोपी विशाल सुभाष घोडके यास त्याच्या घराजवळ पकडून रिक्षा व मोबाईल असा एकूण दोन लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच यातील दुसरा आरोपी जावेद शेख राहणार मिरज याचाही शोध सुरू आहे , सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.महात्मा गांधी चौक पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मिरजेत चाकुचा धाक दाखवून २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल नेणाऱ्याला केली अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -