Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत मुलीकडून पित्याचा खून : शहरात खळबळ

इचलकरंजीत मुलीकडून पित्याचा खून : शहरात खळबळ

ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
इचलकरंजीत मुलीने पित्याचा खून केल्याची घटना आज मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सदरची घटना येथील बरगे मळा परिसरात घडली.



 घरगुती वादातून  मुलीने लोखंडी गजाने मारहाण करून पित्याचा निर्घृण  खून केला. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंदविण्यात येत होती. शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे  वय 45 राहणार बर्गे मळा असे मृताचे नाव आहे. संशयित मुलीला  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


 
येथील बर्गे मळा परिसरात शांतिनाथ केटकाळे आई पत्नी सुजाता व तीन   मुलीसह राहतात आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात वाद झाला या वेळी चिडून मोठ्या मुलीने त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार केला या त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील  बाजूचा चेंदामेंदा झाला.

दरम्यान केटकाळे यांच्या आईने केलेला  आरडाओरडा ऐकून नागरिकांनी धाव घेतली तर संशयित मुलगी व त्यांची आई यांनी घराबाहेर धाव घेतल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले . केटकाळे यांना  तात्काळ  खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून  इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले  खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित मुलीला ताब्यात घेतले.

येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात शव विच्छेदन करण्याचे काम  उशिरापर्यंत सुरू होते. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे  घटनास्थळी तसेच इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी आदींनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या अधिक तपास शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे करत आहेत.दरम्यान या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -