गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा दर आज 0.31 टक्क्यांनी घसरला तर चांदीचा दरही 0.23 टक्क्यांनी घसरला आहे. काल सोन्याचा भाव 0.76 टक्क्यांनी मजबूत होत होता तर चांदीच्या दरात 1.10 टक्क्यांची वाढ झाली
आहे.
चांदीचा दरही 0.23 टक्क्यांनी घसरला आहे. काल सोन्याचा भाव 0.76 टक्क्यांनी मजबूत होत होता तर चांदीच्या दरात 1.10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते लवकर खरेदी करा. 2022 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,000 रुपयांच्या वर जाऊ शकतो, असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.
सोन्या-चांदीचा भाव एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.31 टक्क्यांनी घसरून 50,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह चांदी 64,200 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.