आज पुन्हा एकदा नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे. पंचेचाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना यावेळी मुंबई महापालिकेसाठी शिवसेना तिकीट देणार नसल्याची छुपी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यावरून शिवसेनेचे अनेक विद्यमान नगरसेवक नाराज आहेत. म्हणूनच युवराजांना पेंग्विन म्हणतात असे स्वतःच जाहीर करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उत्साहात दिसत होत्या असा चिमटा नितेश राणे यांनी घेतला आहे. तसेच शिवसेनेमधील अंतर्गत दुफळी देखील स्पष्टपणे दिसून येत असल्याचे यावेळी राणे यांनी म्हटले आहे. दिशा सालियन प्रकरणावर चर्च नको असे संजय राऊत यांनी किशोरी पेडणेकर यांना आधीच सांगितले होते. मात्र तरी देखील किशोरी ताई थांबल्या नसल्याचे नितेश यांनी म्हटले आहे.
सध्या राज्यात दिशा सालियन प्रकरण चांगलेच गाजत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना पहायला मिळत आहे. यावरूनच आता नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. दिशा सालियन प्रकरणावर चर्चा नको असे संजय राऊत यांनी आधीच किशोरी पेडणेकर यांना ठणकावले होते. तरी देखील पेडणेकर गप्प बसल्या नाहीत. त्यांनी या प्रकरणात महिला आयोगाला पत्र लिहिले तसेच सालियन परिवाराला मीडियासमोर आणल्याचे नितेश यांनी म्हटले आहे.